Tue, Nov 13, 2018 04:10होमपेज › Satara › शिवपार्वती विवाह सोहळा थाटात 

शिवपार्वती विवाह सोहळा थाटात 

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:50PMतारळे  : वार्ताहर

तारकेश्‍वर महाराज की जयच्या गजरात येथील तारकेश्‍वर यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सायंकाळी गोरज मुहूर्तावर शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी तारळे विभागासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.  ग्रामदैवत श्री तारकेश्‍वर या त्रा दहा दिवस चालते. महाशिवरात्री हा यात्रेचा मुख्य दिवस. पारायणाची सांगता सोमवारी धारेश्‍वरकर महाराजांच्या हस्ते कुंभाभिषेकाने झाली. यावेळी शेकडो मुले महिला यांनी तारळी नदीतून डोक्यावरून पाण्याचे कलश आणले.

मंगळवारी सकाळपासूनच बेल फुले घेऊन  भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी  भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी नवलाई देवीची पालखी वाजत गाजत तारकेश्‍वर मंदिराजवळ आणण्यात आली. त्यानंतर मानकरी व सासनकाट्यांचे स्वागत करण्यात आले. धारेश्‍वरकर महाराज व मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल. यावेळी तारकेश्‍वर महाराज की जय, नवलाई माता कि जय चा जयघोष करत गुलाल खोबर्‍याची उधळण करण्यात आली. वाजत गाजत रथ मिरवणूक  सुरू झाली. रथापुढे मैदानी खेळाची प्रात्यक्षिके करण्यात आली. जागोजागी सुवासिनींनी रथाचे पूजन केले. गोरज मुहूर्तावर शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. यात्राकाळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.