Wed, May 22, 2019 06:15होमपेज › Satara › जिल्ह्यात ४० गावे, ११९ वाड्यांना टँकरने पाणी 

जिल्ह्यात ४० गावे, ११९ वाड्यांना टँकरने पाणी 

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 11:46PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाईही भासू  लागली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील 40 गावे व 119 वाड्यांमधील 51 हजार 627 नागरिकांना  व 7  हजार 795 जनावरांना आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत असून जिल्ह्यात सुमारे 35  टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

माण तालुक्यातील विरळी, पुकळेवाडी, पाचवड,  वारूगड, मोगराळे, कुकुडवाड, जाधववाडी  उकीर्डे, पांगरी, शिंदी बु., तोंडले, पिंगळा खुर्द, पळशी व परकंदी या 14 गावांसह बागलवाडी, जमालवाडी, कापूसवाडी, लाडेवाडी, आटपाडकरवस्ती, शेळकेवस्ती, शिंगाडेवस्ती, पाटीलवस्ती, पवारवस्ती, जगतापवस्ती, साळुंखेवस्ती,  गायदरा, मठवस्ती, खांडेवाडी, उगळेवाडी, गरडाचीवाडी, आमजाई, जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, खालचा गोठा, वरचा गोठा, रामोशीआळी, चव्हाणवस्ती, शिवाजीनगर, मानेवाडी यासह  80  वाड्यावस्त्यांमधील 16 हजार 807 नागरिकांना 10 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी  4 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

खटाव तालुक्यातील  गारवडी, पाचवड, ढोकळवाडी, अनफळे, नवलेवाडी, मायणी, कानकात्रे या 7 गावांतील व आवळेपठार, बाबरवस्ती, भोसलेवस्ती, सापकरवस्ती, कर्देवस्ती, यलमरवस्ती, चव्हाणवस्ती, शिरतोडेवस्ती, पाईनवस्ती,  माळीवस्ती, कठरेवस्ती, शिंदेवाडी, भिसेवस्ती, फुलेनगर, मोहननगर, लक्ष्मीनगर, दगडेमळा, रामोशीवस्ती,  विटा रोड, यशवंतनगर,  माळीनगर, खडकाचा मळा, मसोबा मळा, वडाचा मळा, जाधववस्ती,  शेराचे टेक या 27  वाड्यामधील 14 हजार 338 नागरिकांना  व 347 जनावरांना  5 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  कोरेगाव तालुक्यातील भंडारमाची, भाटमवाडी, रामोशीवाडी , तडवळे सं.वाघोली, बोधेवाडी (भाडळे) , वाठारस्टेशन  या 6 गावातील 9 हजार 707   नागरिकांना  व 3 हजार 92 जनावरांना 5टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथील 415 नागरिक व 126 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील  बालेघर, मांढरदेव व गडगेवाडी येथील  2 हजार 661 नागरिकांना  व 931 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी (भोसगाव) व फडतरवाडी  येथील  842  नागरिकांना व 243 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील  करोशी, प्रतापगड, वेळापूर, गोरोशी, आचली, राजपुरी, तायघाट, फणसवाडी, घोगलवाडी, कोंडोशी येथील 3 हजार 514 नागरिकांना व 1 हजार 330  जनावरांना 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जावली तालुक्यातील  केळघर, दरे बु., ओखवडी, खिलारमुरा, निपाणीमुरा, सावरी,वाटांबे, वारणेवस्ती, ओखवडीमुरा येथील  3 हजार 343 नागरिकांना व 1 हजार 726 जनावरांना 7 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत 21 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असल्याची माहिती  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. सप्रे यांनी दिली. मात्र दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.