Thu, Jul 18, 2019 12:35होमपेज › Satara › हप्ता दे नाहीतर धंदा बंद कर म्हणत एकावर तलवार हल्ला

सातारा : खंडणी न दिल्याने एकावर तलवार हल्ला

Published On: May 11 2018 12:29PM | Last Updated: May 11 2018 12:29PMसातारा : प्रतिनिधी

देगाव फाटा येथील एका पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस भारत भांडवलकर (वय २२, रा. कृष्णानगर, सातारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तेजस भांडवलकर याचा देगाव फाटा येथे पानटपरीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजता तो पानटपरी बंद करून घरी निघाला होता. दरम्यान, त्याठिकाणी श्रीकांत जाधव ऊर्फ पप्पू पॅरागॉन, संदीप जाधव ऊर्फ पप्पू टीस, गणेश भोसले, अभिजित आबा जाधव व इतर दोन ते तीनजण आले. श्रीकांतने 'मला हप्ता देऊन धंदा करायचा, नाहीतर धंदा बंद करायचा,' अशी धमकी दिली. त्यावेळी तेजसने 'हप्ता देणे परवडत नाही,' म्हटल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चौघांनी शिवीगाळ करून हातावर तलवाराने वार केला. त्याचबरोबर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत तेजस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम करीत आहेत.

Tags : Crime, MAn, Attack, Sword, Extortion