Fri, Apr 19, 2019 08:13होमपेज › Satara › सिव्हिल हॉस्पिटलमधील संशयित पलायनप्रकरणी पोलिस निलंबित

सिव्हिल हॉस्पिटलमधील संशयित पलायनप्रकरणी पोलिस निलंबित

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

प्रिझन वॉर्डमधील संशयित आरोपी विशुत नवाते हा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस हवालदार हिरालाल दिनकर पवार यांना निलंबित केले. संशयिताला डिस्चार्ज झाल्यानंतर एकटे घेऊन जाण्याऐवजी आणखी सोबत पोलिस सोबत घ्यायला पाहिजे होते; मात्र तसे न करता बेजबाबदार वागल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी फसवणूक प्रककरणातील संशयित आरोपी विशुत नवाते हा पोलिसांच्या हातावर तुरी देवून सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातून पळून गेला होता. गेल्याच महिन्यात लुंगी डान्स प्रकरणामुळे प्रिझन वॉर्ड पोलिसांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना लगेच दुसर्‍या महिन्यात सिव्हीलमध्ये संशयित आरोपी पळून गेल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर याप्रकरणी विशुत नवातेवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवाते याचा पोलिस शोध घेत असून दुसर्‍या दिवशीही तो पोलिसांना सापडला नव्हता. बुधवारी सांयकाळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईचा दंडूका उगारुन हिरालाल पवार यांना निलंबीत केले असून त्यांच्या प्राथमिक चौकशी आदेश देण्यात आले आहेत.