Sat, Nov 17, 2018 18:32होमपेज › Satara › फलटण : बाणगंगेजवळ युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला 

फलटण : बाणगंगेजवळ युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला 

Published On: Feb 05 2018 11:00AM | Last Updated: Feb 05 2018 11:00AMफलटण : प्रतिनिधी 

वेलणकर दत्त मंदिर जवळ बाणगंगा नदी पात्रात आज (सोमवार) सकाळी संशयास्पद मृतदेह आढळून आला. अंदाजे ३५ ते ४०  वयाच्या युवकाचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. तर घटनास्थळावर स्थानिक लोकांमध्ये या युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे.

सध्या फलटण शहर व तालुक्यात खूनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर, आज सकाळच्या सुमारास नदीपात्रात असा संशयास्पद मृतदेह आढळला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घटनास्थळी अद्याप पोलिस पोहचले नाहीत.