Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘मोका’तील फरारी पप्पू घुले जेरबंद

‘मोका’तील फरारी पप्पू घुले जेरबंद

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:25PMसातारा : प्रतिनिधी

दत्ता जाधवच्या टोळीतील जत (जि. सांगली) मधील मोकामध्ये पाहिजे असलेल्या संशयित आरोपी सुरज ऊर्फ पप्पू घुले (वय 29, रा. गोडोली) याच्यासह आणखी दोघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण दोन गावठी पिस्तूल व कार असा एकूण 6 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला. या कारवाईत पुसेगाव येथील दुकानादारालाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई सातारा एलसीबीने केली आहेे. तसेच सातार्‍यात घरफोडीप्रकरणी संशयित महिलेसह सोने खरेदी करणार्‍या एका सराफासही  अटक करण्यात आली. दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार व पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी संयुक्‍तरीत्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.बंदूकप्रकरणी सुरज उर्फ पप्पू भिमराव घुले, नितीन भिमराव खरात (वय 26, रा.पुसेगाव) व विरधवल किरण देशमुख (वय 25, रा.खटाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव येथे काही संशयितांकडे बंदूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुसेगाव येथे सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ कारमधून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक बंदूक सापडली. पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने ती बंदूक पप्पू घुले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याने आणखी एक पिस्टल खटाव येथील हार्डवेअरचा दुकानदार विरधवल देशमुख याला विकले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानुसार विरधवल याला ताब्यात घेवून अटक केली.

एका संशयिताकडून माहिती मिळेल त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाईला  सुरुवात केल्यानंतर पप्पू घुले याला ताब्यात घेण्यात आले. तो जत येथील पोलिस हल्ल्यात पाहिजे असलेला तसेच मोक्‍कामधील पाहिजे असलेला संशयित आरोपी असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. यामध्ये पप्पू घुलेवर बारामती, सातारा शहर व जत  पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न व मोक्‍कासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही सर्व लिंक एकच असल्याने व त्यांच्याकडे शस्त्रे सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल अटक केली व न्यायालयात हजर केेले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3 सप्टेंबर रोजी बुधवार पेठ येथून तक्रारदार शकील बन्‍ने यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला होता. शाहूपुरी पोलिस याप्रकरणाचा तपास करत असताना अल्पवयीन दोन शाळकरी मुलांनी सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्या दप्‍तरामध्येच चोरीचे थोडे दागिने मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली देवून उर्वरीत दागिने असलेल्या महिलेस ताब्यात घेवून चौकशी केली असता तिनेही चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मुले व महिलेकडून दागिने जप्‍त केल्यानंतर त्यामध्ये आणखी दागिने कमी असल्याचे व ते एका सराफास विकल्याचे  समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ज्वेलर्स दुकानदारा  याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने महिलेकडून दागिने घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ज्वेलर्स दुकानदाराला अटक केली. संशयित महिला व ज्वेलर्स दुकानदाराला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.  एलसीबी व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे, सपोनि विठ्ठल शेलार, फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मयुर देशमुख, संकेत माने, मारुती अडागळे, गणेश कचरे, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, संतोष लेंभे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, धिरज बेचके, प्रिती माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.