Wed, Jan 23, 2019 01:03होमपेज › Satara › सातारच्या खेळाडूंना सहकार्य : ना. तावडे

सातारच्या खेळाडूंना सहकार्य : ना. तावडे

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:33PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील विशेषत: सातारा शहरातील खेळाडूंना छत्रपती शिवाजी राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून ही बाब गौरवाची आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन  शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले.

सातार्‍यातील सात खेळाडूंचा छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्यावतीने  मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विनोद तावडे म्हणाले, सातार्‍याच्या मातीत खेळाडू घडत आहेत ही चांगली बाब आहे. प्रत्येक खेळप्रकारातील खेळाडू हे सातार्‍याचे नाव उज्वल करतात.त्यामुळे इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. आपणाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील. तसेच येणार्‍या भविष्यकाळात प्रत्येक खेळासाठी आपले महत्वपूर्ण योगदान राहिल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

शनिवारी मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल  सी. विद्यासागर राव, शिक्षण व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याहस्ते ललिता बाबर (अथॅलेटिक्स), शिवराज ससे (नेमबाजी), एकता शिर्के (आर्चरी), सायली शेळके (रोईंग), स्नेहल शेळके (रोईंग), आशिष माने (गिर्यारोहण), सतीश कदम (पोहणे) यांना 1 लाख रूपये व मानपत्र देवून गौरवण्यात आले. भाजपाच्यावतीने सातारा पालिकेचे गटनेते धनजंय जांभळे, नगरसेवक मिलिंद काकडे, राकेश शेंडगे व अन्य पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.