Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Satara › शिरसवडी येथील शेतकर्‍याची आत्महत्या

शिरसवडी येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:12PM

बुकमार्क करा

कातरखटाव : वार्ताहर 

खटाव तालुक्यातील  शिरसवडी येथील शेतकरी  शांताराम किसन इंगळे (वय 50) यांनी शनिवार दि. 9 रोजी आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद गुरूवारी वडूज पोलिस ठाण्यात झाली आहे. 

शांताराम इंगळे यांनी बामणाच्या नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या केली होती.  त्यांनी शेतीसाठी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी,  दोन मुलगे, एक मुलगी व सून असा परिवार आहे. घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस हवालदार शांतिलाल ओंबासे करीत आहेत.