Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Satara › कुडाळ : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

कुडाळ : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 8:04PMकुडाळ : प्रतिनिधी

जावळी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली  माहिती अशी की,  अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या आई वडिलांच्या समवेत होती. मात्र कामानिमित्त आई वडील बाहेर गेले असताना तिने साडे सात वाजता आत्महत्या केली. या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री उशिरा मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.