Sun, Nov 18, 2018 20:43होमपेज › Satara › अपघातात ऊसतोड कामगार ठार

अपघातात ऊसतोड कामगार ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनीधी 

वाठार (किरोली) ते मसूर मार्गावर तारगाव फाट्यानजीक भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने दुचाकीला समोरासमोर  धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऊसतोड कामगार कौसराम बलभीम (वय 23, रा. शिंदेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) जागीच ठार झाला. अन्य  एकजण जखमी झाला. 

वाठार (किरोली) ते मसूर मार्गावर शुक्राचार्याच्या गाव ओढ्यापलीकडे कडबान शिवारात ऊसतोड टोळी वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान ऊसतोड मजूर कौसराम बलभीम व विष्णू बाबासाहेब बारगजे (वय 26, रा.मोहरी, पोस्ट खरडा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) हे दोघे वाठार गावातून वस्तीकडे  दुचाकीवरुन (क्र. एमएच 11 एलएक्स 8130) निघाले होते. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने (क्र. एमएच 11 ई 2014) दुचाकीला तारगाव फाट्यानजिक जोरदार धडक दिली.

त्यामध्ये कौसराम बलभीम जागीच ठार झाला. तर विष्णू बारगजे जखमी झाला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक अरुण निवृत्ती कांबळे (वय  49) फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार रतन कांबळे करीत आहेत.

 

Tags : satara, satara news, accident, Sugarcane workers, killed,


  •