Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Satara › जिल्ह्यात उसाची पळवापळवी सुरू

जिल्ह्यात उसाची पळवापळवी सुरू

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:10PM

बुकमार्क करा
सातारा : प्रविण शिंगटे 

सातारा जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू असून जिल्ह्याबाहेरील कारखान्यांच्या  टोळ्या ठिकठिकाणी आल्या आहेत. ऊस क्षेत्र कमी असल्यामुळे उसाची पळवापळवी सुरू आहे. जिल्ह्यात आजअखेर 31 लाख 26 हजार 72 मे.टन उसाचे गाळप होवून 33 लाख 95 हजार 115 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.साखरेचा सरासरी साखर उतारा 10.86 पडला आहे.

जिल्ह्यात 8 सहकारी व 6 खाजगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासूनच पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच कारखान्यामध्ये उसाला जादा दर देवून उस पळवापळवीचे सत्र सुरू आहे. ज्या कारखान्यांनी इतर कारखान्यांच्या तुलनेत उस दर कमी दिला आहे अशा कारखान्यांना उस घालण्यास शेतकरी नकार देत आहेत.

उसाचे क्षेत्र मोकळे करून अन्य पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. मात्र, उस क्षेत्र कमी असल्यामुळे जिल्ह्याबाहेरील कारखान्यांच्या उस टोळ्या जिल्ह्यात येत असून त्यासाठी विविध कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी जावून शेतकर्‍यांशी चर्चा करताना दिसत आहेत.

श्रीराम जवाहर कारखान्याने 1 लाख 74 हजार 186 मे. टन उसाचे गाळप करून 1 लाख 92 हजार 150 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 3 लाख  54 हजार 640 टन उसाचे गाळप करून 4 लाख 11  हजार 90 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. किसनवीर सहकारी साखर कारखान्याने 2 लाख 6 हजार 150 टन उसाचे गाळप करून2 लाख 20 हजार 240 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई  साखर कारखान्याने 81 हजार 70 टन उसाचे गाळप करून 86 हजार 150 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.सह्याद्री साखर कारखान्याने 4 लाख 47 हजार 100 टन उसाचे गाळप करून 5 लाख 29 हजार 160 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 2 लाख 18  हजार 10 टन उसाचे गाळप करून 2 लाख 38 हजार 430 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. रयत सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 62 हजार 580 टन उसाचे गाळप करून 1 लाख 76 हजार 420 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याने 92 हजार 480 टन उसाचे गाळप करून 91 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. न्यू फलटण कारखान्याने 1 लाख 48 हजार 46 टन उसाचे गाळप करून 1 लाख 51 हजार 890 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

जयवंत शुगरने 2 लाख 36 हजार 930 टन उसाचे गाळप करून 2 लाख  77 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. ग्रीन पॉवर शुगर लिमिटेडने 2 लाख 14  हजार 455 टन उसाचे गाळप करून 2 लाख 37 हजार 340 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. स्वराज्य इंडिया अ‍ॅग्रो लिमिटेडने 2 लाख 29 हजार 851 टन उसाचे गाळप करून 2 लाख 18 हजार 505 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. शरयु शुगर लिमिटेडने 3 लाख 34 हजार 535 टन उसाचे गाळप करून 3 लाख 36 हजार 650 क्विटंल साखरेचे उत्पादन झाले. सातारा जिल्ह्यात सरासरी साखरेचा उतारा 10.86 पडला.