‘कोयना’ची पाणी स्थिती भक्‍कम
 

| पुढारी"> 
Wed, May 27, 2020 09:33होमपेज › Satara ›

‘कोयना’ची पाणी स्थिती भक्‍कम
 

‘कोयना’ची पाणी स्थिती भक्‍कम
 

Published On: Apr 05 2018 12:23AM | Last Updated: Apr 05 2018 12:12AMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरण तांत्रिक वर्षपूर्तीला दोनच महिने शिल्लक असताना धरणात तब्बल 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या तांत्रिक वर्षासह आगामी वर्षारंभाचाही पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गतवर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाणीवापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. 1 जून ते 31 मे अशा कालावधीत कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष चालते. यापैकी दहा महिने पूर्ण झाले असून महत्त्वपूर्ण गरजेचे व ज्यादा पाणी 

मागणीचे चालू तांत्रिक दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. वर्षभरात पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी  पाणी आरक्षित असते. आत्तापर्यंत यापैकी 44.71 टीएमसी  पाणीवापर झाला असून या कोठ्यापैकी 22.79 टीएमसी  पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. दरमहा सरासरी 5.50 टीएमसी  पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. 
त्यामुळे शिल्लक कोठा लक्षात घेता येणार्‍या काळात येथे सरासरीपेक्षाही चार पटीने ज्यादा वीजनिर्मिती करणे शक्य आहे. गेल्या काही वर्षात येथे सिंचनासाठी पाणी मागणी वाढत चालली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी सरासरी

35 टीएमसी पाणीवापर केवळ सिंचनासाठी झाला आहे. यावर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी 19.55 टीएमसी  पाणीवापर झाला आहे. अजून पंधरा ते सोळा टीएमसी  पाणीवापर होवू शकतो. धरणात सध्या 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दोन महिन्यांसाठी पश्‍चिमेकडील आरक्षित 22.79, सिचंनासाठी पूर्वेकडील 15.50 तर मृतसाठा 5 अशा एकूण 43.29 टीएमसी पाणीवापरानंतरही धरणात जवळपास 20 ते 22 टीएमसी  पाणी शिल्लक रहाणार आहे. त्यामुळे एक जूनपासून सुरू होणार्‍या नव्या तांत्रिक वर्षात जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही तरी त्याकाळात विजेची व सिंचनाची गरज भागविण्यासाठी हा शिल्लक पाणीसाठा महत्वपूर्ण ठरणार आहे. 

Tags : Satara, Sufficent, Water, Koyna Dam