Tue, Jan 22, 2019 06:02होमपेज › Satara › दुचाकीला ठोकरून टँकर उलटला; विंगची महिला ठार

दुचाकीला ठोकरून टँकर उलटला; विंगची महिला ठार

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 11 2018 12:29AMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद-शिरवळ रस्त्यावर शेडगेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत टँकर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील अश्‍विनी जालिंदर चव्हाण (रा. विंग, ता खंडाळा) ठार झाल्या, तर एकजण गंभीर जखमी झाला. शेडगेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दुपारी शेडगेवाडी फाट्याच्या पुढे लोणंदकडे जाणारा टँकर (एम.एच. 04 ईबी 7287) चालक सुनील संताजी ननावरे घेऊन येत होता. त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने तो समोरून येणार्‍या दुचाकीला (एम.एच. 12 एफडब्ल्यू 713)धडकला.  या अपघातात अश्‍विनी जालिंदर चव्हाण रा. विंग, ता खंडाळा ही महिला   व दुचाकीस्वार विनोद सुरेश पाटोळे हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान अश्‍विनी चव्हाण यांचा मृत्यू झाला तर पाटोळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

अरुंद रस्त्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बेजबाबदारपणे टँकर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात लोणंद पोलिसात फिर्याद देण्यात आली असून सुनिल ननावरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हवालदार लक्ष्मण डोंबाळे हे तपास करत आहेत.