Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Satara › पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

Published On: Aug 28 2018 1:46AM | Last Updated: Aug 27 2018 10:01PMउंडाळे : प्रतिनिधी 

येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी 8 हजार 200 रूपये मदत गोळा केली आहे. जमा झालेले पैसे तहसीलदारांकडे दिले जाणार आहे.  

मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन लाखो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तर शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. केंद्र सरकार, राज्य शासन तसेच विविध सामाजिक संस्थांही मदतीसाठी सरसावल्या आहेत. यातूनच प्रेरणा घेत स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पॉकेट मनी, तसेच वाढदिवस, अन्य कार्यक्रमांसाठी केल्या जाणार्‍या खर्चाला फाटा देत ते पैसे पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उंडाळेसह परिसरात घरोघरी जाऊनही विद्यार्थ्यांनी मदत गोळा केली आहे. उंडाळे परिसरातील व्यापारी, ग्रामस्थ, विक्रेते यांनी उपक्रमाचे कौतुक करत सहकार्य केले. त्यातून आर्थिक मदत जमा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.