Fri, Apr 19, 2019 08:29होमपेज › Satara › आठवीमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:52PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुष्कर विलास देसाई (वय 14, रा. यशवंत अपार्टमेंट, विद्यानगर- सैदापूर, कराड)  असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुष्कर देसाई हा इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. तो आई-वडील व बहिणीसह विद्यानगर येथे राहत होता. नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. 29)तो रात्री बेडरूममध्ये झोपला होता. गुरुवारी सकाळी साडेसात वाजले तरी तो उठला नसल्याने वडिलांनी दरवाजा वाजवून उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळत 

नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले, त्यावेळी त्याने साडीच्या साहायाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पुष्करने आत्महत्या का केली असावी, याचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती विलास दत्तात्रय देशमुख (रा. विद्यानगर) यांनी शहर पोलिसांत दिली आहे.