Sun, May 26, 2019 08:40होमपेज › Satara › कराड : राष्ट्रवादीकडून उत्तरची विद्यार्थी कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त

कराड : राष्ट्रवादीकडून उत्तरची विद्यार्थी कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त

Published On: Jun 20 2018 12:57PM | Last Updated: Jun 20 2018 12:57PMकराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) येथील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची विद्यार्थी कार्यकारिणी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. याची माहिती विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीराज नांगरे - पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकून नवीन जोमाने पक्ष संघटना वाढवण्यासाठी नव्या दमाची कार्यकारिणी निवडली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या कार्यकारिणीद्वारे प्रयत्न केले जाणार असून लवकरच ही कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचेही नितीराज नांगरे - पाटील यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.