Wed, Apr 24, 2019 08:26होमपेज › Satara › सातार्‍यात १ जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

सातार्‍यात १ जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:17PM

बुकमार्क करा
सातारा: प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युर बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने दि. 1 ते 5 जानेवारी या कालावधीत तालीम संघ मैदान येथे राज्यस्तरीय युथ बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व रवींद्र झुटींग यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चोरगे म्हणाले, या स्पर्धेत राज्यातील 300 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामध्ये 200 युवक व 100 युवतींचा समावेश आहे. दि. 1 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सकाळी 8 ते 10 या वेळेत तालीम संघ ते राजवाडा या दरम्यान रॅली काढण्यात येणार आहे. 

प्रत्येक दिवशी 80 सामने खेळवण्यात येणार आहेत. दि. 5 रोजी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष आ. अजित पवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 

या स्पर्धेसाठी 25 पंच व विविध राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा संघटनेचे योगेश मुंदडा, सागर जगताप, निवृत्ती भोसले, प्रताप गुजले व पदाधिकारी उपस्थित होते.