होमपेज › Satara › ‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शनास आजपासून प्रारंभ 

‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शनास आजपासून प्रारंभ 

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:19PMसातारा : प्रतिनिधी

‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता करिअर संधीचे नवे दालन आजपासून खुले होत आहे. शुक्रवार, दि. 8 ते 10 जून या कालावधीत सातार्‍यातील पोलिस करमणूक केंद्रात होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्या दृष्टीने बहुविध माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटांचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, पुणे, असोसिएट स्पॉन्सर्स विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे, को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठावाडा मित्र मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्‍त विद्यमाने 8 ते 10 जून यादरम्यान ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दहावी, बारावी या महत्त्वाच्या परीक्षांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढे काय करायचे? याबद्दल अभ्यासक्रमांची रेलचेल सध्या समोर दिसते. पालक आणि विद्यार्थी याबाबत संभ्रमावस्थेत असतात.  मात्र, या अभ्यासक्रमांची सर्वंकष माहिती तसेच नेमके आणि अचूक करिअर निवडीचे मार्गदर्शन आता सहजपणे येथे उपलब्ध होणार आहे. दैनिक ‘पुढारी’च्या ‘एज्यु दिशा’ करिअर प्रदर्शनाला गेली दोन वर्षे  विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्याच धर्तीवर आता आजपासून ‘पुढारी’ एज्यु दिशा प्रदर्शन सुरू होत आहे. यामध्ये तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांच्याही मनात असणार्‍या अनेक शकांचे निरसन तीन दिवस चालणार्‍या प्रदर्शनातून होणार आहे. प्रदर्शनाने करिअरच्या हजारो वाटा विद्यार्थी-पालकांसाठी खुल्या होणार आहेत.

येथील पोलिस करमणूक केंद्रात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते व संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. व्ही. व्ही. गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.  

12 वीचा नुकताच निकाल लागला असून आजच दहावीचाही निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे ‘पुढारी’ एज्यु दिशा हे प्रदर्शन या विद्यार्थी व पालकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. विविध क्षेत्रात कोणत्या संधी आहेत? तसेच प्रवेश प्रकियेसाठी कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे,  याबाबत विद्यार्थी वर्गात संभ्रमावस्था असते. ‘पुढारी’च्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना याबाबत उपयुक्‍त मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाबाबत विद्यार्थी व पालकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.