Wed, Jan 22, 2020 19:11होमपेज › Satara › विराट शक्‍तीप्रदर्शनाने श्रीनिवास पाटील,दीपक पवारांचे उमेदवारी अर्ज दाखल 

विराट शक्‍तीप्रदर्शनाने श्रीनिवास पाटील,दीपक पवारांचे उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: Oct 03 2019 3:06PM | Last Updated: Oct 03 2019 3:04PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. आज (ता.०३) त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी दीपक पवार यांनीही सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. 

तत्पूर्वी सातार्‍यातून एकत्रितपणे गांधी मैदान येथून विराट रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाचे पदाधिकारी यावेळी रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी गांधी मैदान येथून फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि राष्ट्रवादी पार्टीचा विजय असो, शरद पवार तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणांनी रॅलीमध्ये रंग भरला. पोवाई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.