Mon, Apr 22, 2019 22:03होमपेज › Satara › सातार्‍यात आज महिलांसाठी ‘श्रीदेवी हिटस्’

सातार्‍यात आज महिलांसाठी ‘श्रीदेवी हिटस्’

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 8:35PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने सभासद महिला व युवतींसाठी  बुधवार दि. 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. गजानन मंगल कार्यालय येथे वैशाली चंद्रसाळी थ्री स्टार्स ग्रुपच्या ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थांच्या पाक स्पर्धाही होणार आहेत.

दै. ‘पुढारी’  कस्तुरी क्लब-च्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम  राबवले जातात.  उन्हाळी सुट्टीतील मौजमजेत भर घालण्यासाठी क्लबच्यावतीने ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच यावेळी महिलांच्या पाककलेला वाव मिळावा, मुलांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश व्हावा, या उद्देशाने दुग्धजन्य  पदार्थांच्या पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक  फलटण येथील निसर्ग उद्योग समूहाचे संचालक राजकिरण हनुमंत जाधव हे असून गिफ्टींग प्रायोजक कणक ब्युटीपार्लर, निशा बुटिक, सोमेश्‍वर शैक्षणिक व सामाजिक संस्था, पद्मनाभ अलंकार हे आहेत. 

निसर्ग प्रतिजैविक मुक्त दुधामध्ये अधिक प्रोटीन व फॅट असून आरोग्यासाठी होणारे विविध फायदे याबाबत राजकिरण जाधव महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या उन्हाळी सुट्टया लागल्याने महिला व बच्चे कंपनी निवांत झाली असून सुट्टीच्या वेळात मुलांना पौष्टिक  दुग्धपदार्थ खायला घालण्यासाठी माता-पालक सरसावले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’  कस्तुरी क्लबच्यावतीने दुग्धजन्य पदार्थांच्या पाकस्पर्धा घेण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेत सहभागी सदस्यांनी घरुन दुग्धजन्य पदार्थ तयार  करुन आणावयाचे असून उत्कृष्ट सजावटीमध्ये त्याची मांडणी करावयाची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी दै. ‘पुढारी’ कार्यालय येथे  तेजस्विनी बोराटे 8805007192 यांच्याशी  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आले आहे.