Sat, Jun 06, 2020 16:16होमपेज › Satara › सोशल मीडियावर गणेश भक्‍तीचा जागर

सोशल मीडियावर गणेश भक्‍तीचा जागर

Published On: Sep 14 2018 1:33AM | Last Updated: Sep 13 2018 9:04PMसातारा : प्रविण शिंगटे

‘ताशाचा आवाज तरारारा झाला अन् गणपती माझा नाचत आला...’, अशा उत्साही वातावरणात घरोघरी बाप्पा आले. त्याचबरोबर सोशल मीडियावरही बाप्पांचा गजर झाला.  गणेशभक्तांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून बाप्पाप्रती असलेल्या भक्तीचा जागर सुरू केला आहे. 

फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, इन्स्ट्राग्राम ,यु टुब, हॉयक, स्नॅपचॅटच्या माध्यमातून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणेशचतुथीॅच्या शुभेच्छा’ अशा पोस्टमधून सोशल मिडीया गणेशमय झाला आहे. तसेच बाप्पाच्या आगमनाचे फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. गणेशाचे घरातले आगमन आणि सोशल मिडीयावरचे आगमन अशा दोन पातळीवर आजची पिढी गणरायाच्या स्वागताचा सोहळा साजरा करण्यात दंग आहे. 

अनेक गणेशभक्तांनी आपला व्हॉटसअ‍ॅप डीपीवर गणेशाची प्रतिमा, तर काहींनी  आपल्या घरातील व मंडळातील गणेशमुर्तीचे छायाचित्र ठेवल्याचे दिसून येत आहे.बाप्पाला माव्याचे मोदक  नेण्याऐवजी वा घरी दर्शनाला येताना पेढ्यांचा प्रसाद आणण्याऐवजी या पैशाची देणगी गरीब मुलाना द्या. शालाबाह्य मुले साहित्य विक्री करत असताना दिसत असून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणा अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपणारे आवाहनही गणेशभक्तांनी व्हॉटसअपच्या माध्यमातून केले  आहे.