होमपेज › Satara › सदरबझार परिसरात सर्पमित्रांनी कोब्रा पकडला

सदरबझार परिसरात सर्पमित्रांनी कोब्रा पकडला

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:02PMसातारा : प्रतिनिधी

येथील सदरबझार परिसरातील कॅनॉलच्या एका घरात  विषारी  कोब्रा सापडला.  त्यामुळे घरातील सर्व मंडळींची धांदल उडाली. 

यावेळी परिसरातील नागरिकांनी त्वरित सर्पमित्रांना संपर्क केला. सर्पमित्र सुमित वाघ व पोलिस कॉन्स्टेबल अनिल स्वामी यांनी विषारी कोब्रा  पकडला. त्यांनी हा स्पेक्टॉकल जातीचा कोब्रा  असल्याचे सांगितले. हा कोब्रा  पकडून जंगलात सोडून देण्यात आला आहे.