Mon, May 20, 2019 11:17होमपेज › Satara › नगराध्यक्षांकडूनच राष्ट्रगीताचा अवमान

नगराध्यक्षांकडूनच राष्ट्रगीताचा अवमान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी

लोणंदच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके-पाटील यांनी स्वत:च्या मुलाच्या अनधिकृत बांधकामाचा विषय सभेत येऊ नये, म्हणून काँग्रेस नगरसेवकांच्या संगनमताने सभेत चर्चा सुरू असताना सूचना न देताच जाणीवपूर्वक राष्ट्रगीत सुरू केले. पदाचा गैरवापर करून राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या नगराध्यक्षा व नगरसेवकांवर कारवाई करावी मागणी, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके  व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत नगरसेवक हणमंत शेळके, योगेश क्षीरसागर, किरण पवार, दिपाली क्षीरसागर, कुसुम शिरतोडे, कृष्णाबाई रासकर आदी उपस्थित होते. लक्ष्मणराव शेळके म्हणाले, नगरपंचायतीच्या सभेतील अर्धवट माहितीची चित्रफीत व्हायरल केली आहे. परंतु, संपूर्ण चित्रफीत नगराध्यक्षा जनतेसमोर येवू देत नाहीत. आम्ही 7 नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अवमान केला नसून आपले पितळ उघडे पडू नये म्हणूनच त्यांनी पदाचा गैरवापर करत खोटी तक्रार केली आहे. सभेपूर्वी आमच्या सहीने नगराध्यक्षांनी मुलाने केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे, पत्रकारांना सभेत बसण्यात परवानगी मिळणे, विकासकामे, असे अर्ज दिले होते. हे अर्ज सभेमध्ये वाचलेच नाहीत.

अनधिकृत बांधकामाचा विषय अजेंड्यावर का घेतला नाही? अशी विचारणा उपनगराध्यक्ष  व नगरसेवक सभेत करत होते. त्यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी गप्प बसून होते. अखेर हा विषय सभेत येऊ नये म्हणून नगराध्यक्षांनी बाळासाहेब बागवान, राजेंद्र डोईफोडे यांच्या संगनमताने सभा संपली नसताना पूर्वसूचना न देताच राष्ट्रगीत सुरू केले. किरण पवार व कुसूम शिरतोडे यांनी सभा संपली नाही, राष्ट्रगीत सुरू करू नका, सांगूनही बागवान व डोईफोडे यांनी नगराध्यक्षांसह राष्ट्रगीत सुरु ठेऊन अवमान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे लक्ष्मणराव शेळके म्हणाले.

दोन वर्षातील सभांची मागणी करूनही कोणतीही सीडी दिली नाही. परंतु, या सभेची अर्धवट व्हिडिओ क्‍लिप कशी सोशल मिडियावरव आली? राजकीय द्वेषापोटी व  पितळ उघडे पडु नये म्हणून नगराध्यक्षा पूर्ण क्‍लिप जाणीवपुर्वक येऊ देत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी केला.  भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर, भिकु रासकर, गजेंद्र मुसळे, रविंद्र क्षीरसागर, सुरेश निंबाळकर, अ‍ॅड. गणेश शेळके आदी उपस्थित होते.

 

satara, Lonand news,  lonand nagar panchayat, Snehlata Shelke Patil, national anthem, Contempt,


  •