Fri, Aug 23, 2019 21:44होमपेज › Satara › बदलत्या काळात शुभंकरोतीही लुप्त 

बदलत्या काळात शुभंकरोतीही लुप्त 

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 7:51PMभिलार : मुकुंद शिंदे

बदलत्या काळानुसार पारंपरिकता लोप पावत असून संस्कार व नीतीमूल्यांचाही र्‍हास होत चालला आहे. आता लहान मुले देवापुढे, देवघरात फिरकतच नाहीत. त्यामुळे पूर्वी होणारी शुभंकरोती, आई-वडिलांच्या, आजी- आजोबांचा घेतला जाणारा आशीर्वाद हे क्‍वचितच उरले आहे. वडीलधार्‍यांच्या आज्ञेत राहणारी पिढी नष्ट होऊ लागल्याचे चित्र आहे.

आधुनिक भारताच्या निर्माणामध्ये भारतीय संस्कृतीला खूप महत्व आहे. जगभरातील सर्वश्रेष्ठ अशी भारतीय संस्कृती की ज्या संस्कृतीने अनेक विचारवंत थोर महापुरुष घडविले. परंतु 21 व्या शतकामध्ये बदलत्या काळामध्ये माणसाचे राहणीमानही बदललेे. परंतु हा बदल प्रणालीच्या दिशेने जरी असला तरी त्या प्रगतीमध्ये संस्कृती हरवत चालली आहे. तरुणी, तरुण या बदलामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःला झोकून देत आहे की आधुनिक बदलत्या काळामध्ये तरुणाई हरवून बसली आहे. 

बदलत्या काळामुळे मुले अभ्यासात गुरफटून गेली आहेत.पालकही शाळेचे व अभ्यासाचे नको इतके ओझे त्यांच्यावर टाकत आहेत. त्यामुळेच मैदानावर खेळणारी मुले आता अपवादानेच दिसत आहेत.त्यामुळे कदाचित मुलांचा बुद्धांक वाढला तरी त्यांचे आयुष्यमान मात्र घटत असल्याचे वास्तव चित्र आहे. पूर्वीसारखी गुरुकुलसारखी शिक्षण पद्धती उरली नाही. 

पाटीवरती श्री गणेशा करुन आकडेमोड करणारी मुलं आता संगणकावर गणित सोडवू लागली आहेत. अंगात फाटकेतुटके कपडे घालून, ढिगळ लावून  शिक्षणाचा धडा घेण्यासाठी जाणारी मुलं आता सुटाबुटात मोटारसायकलवरुन शाळेत जात आहेत. यामुळे सगळंच कसं बदललेलं जाणवत आहे.