Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Satara › छिंदमवर कठोर कारवाईची सातार्‍यातून मागणी

छिंदमवर कठोर कारवाईची सातार्‍यातून मागणी

Published On: Feb 17 2018 1:06PM | Last Updated: Feb 17 2018 1:04PMफलटण : प्रतिनिधी 

शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. छिंदमवर कठोर कारवाईची मागणी सातार्‍यातील विविध संघटनेतून होऊ लागली आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजातर्फे फलटण शहर पोलिस स्टेशनला लेखी निवेदन दिले आहे.
यामध्ये त्या निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की,  मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून श्रीपाद छिदम यांनी वादग्रस्त विधान केले असून त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलीसांचे सहकार्याचे आवाहन

उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांनी आवाहन केले आहे की,  शहर व ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच जर कोणी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही  त्यांनी सांगितले.