Sat, Aug 24, 2019 23:50होमपेज › Satara › जाती-धर्म मानणार नाही अशी शपथ घ्यावी :शिवेंद्रराजे(Video)

जाती-धर्म मानणार नाही अशी शपथ घ्यावी :शिवेंद्रराजे(Video)

Published On: Jun 06 2018 3:10PM | Last Updated: Jun 06 2018 3:48PMसातारा : प्रतिनिधी  

मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा येथील शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवतीर्थावरील शिवपुतळयास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सहभागी करून स्वराज्य स्थापन केले होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून समाजामध्ये जाती आणि धर्मामध्ये द्वेष वाढत आहे. हा द्वेष संपवण्याची गरज आहे. त्यासाठी शिवभक्तांनी जाती, धर्म आणि पंथ मानणार नाही. अशी शपथ घेतली पाहिजे.