Sun, Feb 17, 2019 01:03होमपेज › Satara › शॉर्टसर्किटने आग; साडेचार लाखांचे नुकसान

शॉर्टसर्किटने आग; साडेचार लाखांचे नुकसान

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 10:51PMफलटण प्रतिनिधी

शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक दुकानाला मध्यरात्री अडीचच्या दरम्यान अचानक आग लागली. ही आग पसरून शेजारील दोन दुकानेही आगीच्या भक्षस्थानी पडली. यामध्ये सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात लखन सतीश ठोंबरे यांनी दिली आहे

शिंगणापूर रोड येथील खासगी जागेतील साई कॉस्मेटिकला शनिवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच येथील तेथील घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना व दुकानमालकांना याची माहिती दिली.

यानंतर तातडीने फलटण पालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने पहाटे पाचपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत  साई कॉस्मेटिक पूर्णपणे भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच या आगीची झळ शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजलाही बसली. 

दरम्यान अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शेजारी राहणार्‍यांनी  बाजूच्या दुकानांमध्ये गॅसच्या टाक्या असल्याचे सांगितल्यानंतर प्रथम गॅसच्या टाक्या शटर उचकटून काढल्या. यामुळे मोठी दुर्घटना टळली.  आग एवढी भयावह होती की अग्निशमनच्या तीन मोठ्या टँकरची मागणी करावी लागली. रात्री गस्त घालण्यासाठी आलेली पोलीस व्हॅन मधील अधिकारी व कर्मचारी यांनीही मदत केली. पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पोलीस यांनी नुकसानीची पाहणी केली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा घेण्याचे व गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.