Thu, Jan 24, 2019 18:11होमपेज › Satara › सातारा : शिवसेनेचे भाजपविरोधात एप्रिल फूल आंदोलन (व्हिडिओ)

सातारा : शिवसेनेचे भाजपविरोधात एप्रिल फूल आंदोलन (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

आज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. सोशल मिडियावर सर्वत्र एप्रिल फूलचे संदेश पाहायला मिळत आहेत. मात्र कराडमध्ये शिवसेनेने भाजपविरोधात अनोखे पध्दतीने एप्रिल फूल आंदोलन करत भाजपचा निषेध केला. शिवसेनेचे कराड दक्षिण तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, जिल्हा महिला संघटक छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये आज (रविवार दि. १ एप्रिल) दुपारी २ च्या सुमारास शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत भाजपाविरोधात आंदोलन केले. भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी देशातील नागरिकांना अनेक आश्वासने दिेली होती. परदेशातील काळा पैसा देशात परत आणणार, राम मंदिर उभारणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख जमा करणार, शेतकरी कर्जमुक्त होणार यासह अनेक घोषणा भाजप सरकारने केल्या होत्या. मात्र गेल्या चार वर्षात भाजपासरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे. लोकांच्या माथी केवळ थापा मारल्या जात आहेत, असा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शिवसेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.


  •