होमपेज › Satara › रायगडावर होणार शिवरूद्रचा गजर

रायगडावर होणार शिवरूद्रचा गजर

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 8:12PMफलटण : प्रतिनिधी

रायगड किल्ल्यावर बुधवारी अखिल अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक साजरा होणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील निवडक ढोल पथकांना आमंत्रित करण्यात येते. यावर्षीचा हा बहुमान फलटण येथील शिवरुद्रा या ढोल ताशा पथकास मिळाला असून रायगडावर यंदा फलटणच्या ‘शिवरुद्राचा’ गजर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडतो. यावर्षी राज्यातील तीन विशेष ढोल पथकांना महोत्सव समितीने आमंत्रित केले आहे. त्यामध्ये फलटणमधील शिवरूद्रा, पुण्यातील रणवाद्य व नाशिक येथील सह्याद्री गर्जना वाद्य या तीन पथकांना रायगडी वादन करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा कार्यक्रम खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व  खा. संभाजीराजे  छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. रायगडावर वादनासाठी आमंत्रण मिळाल्याने पथकातील युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. यंदा ही संधी शिवरूद्रला मिळाल्यामुळे पथकातील सदस्यांचे अभिनंदन केले जात आहे. मंगळवारी हे पथक रायगडावर रवाना झाले. या पथकात 30 युवक व 25 युवतींचा सहभाग आहे.