Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कराड : भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर (व्हिडिओ)

कराड : भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर (व्हिडिओ)

Published On: Jan 05 2018 12:56PM | Last Updated: Jan 05 2018 1:04PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. भीमा कोरेगाव येथील घटनेमागे नक्षलवादी संघटनांचा हात होता, असा आम्हाला संशय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासह नक्षलवादी संघटनांचीही चौकशी व्हावी. अशी मागणी करत शुक्रवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. 

दत्त चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसिलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पुणे येथे झालेली एल्गार परिषद आणि १ जानेवारीला झालेल्‍या भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारामागे नक्षलवादी संघटना कार्यरत होत्या. असा आम्हाला संशय आहे. राज्यात झालेल्या नुकसानीस प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांची संघटना जबाबदार आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. शासनाने भीमा-कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी. भिडे गुरूजी घटने दिवशी सांगलीतच होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नक्की कोण दोषी आहे? याचा शोध घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.