Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Satara › उदयनराजे यांच्याविरोधात शिवेंद्रराजेंची गांधीगिरी video

उदयनराजे यांच्याविरोधात शिवेंद्रराजेंची गांधीगिरी video

Published On: Aug 30 2018 1:55PM | Last Updated: Aug 30 2018 1:55PMसातारा : प्रतिनिधी 

सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असतानाही सातारा शहर खड्ड्यात गेले असल्याने आज आमदार शिवेंद्रराजे यांनी अचानकपणे गांधीगिरी करत विरोध केला. साताऱ्यातील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने मुजवायला सुरुवात त्यांनी केली. शिवेंद्रराजे यांच्या या भूमिकेने उदयनराजेंच्या गटाला चपराक बसली आहे.

सातारा शहरात पावसामूळे रस्त्याची चाळण झाली आहे. सातारकरांना गेल्या अनेक महिन्यापासून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांनी आपली खदखद नेमकी कुठं व्यक्त करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. याची नस पकडत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वखर्चातुनच सातारा शहर परिसरातील खड्डे मुजवण्याची मोहीम काढली आणि स्वतः खोरे घमेले घेऊन खड्डे मुजवण्यास सुरवात केली.

या सर्व प्रकारामुळे सातारा नगरपालिका सत्ताधारी गटाला एक धपाटा टाकला असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या स्टंटमुळे एक प्रकारचा राजकीय दणकाच शिवेंद्रराजे यांनी नगरपालिकेला दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.