Sat, Mar 23, 2019 18:06होमपेज › Satara › विरोधकांच्या मनात असेल तर मी मुख्यमंत्री सुद्धा होईन : आ. शिवेंद्रराजे

विरोधकांच्या मनात असेल तर मी मुख्यमंत्री सुद्धा होईन : आ. शिवेंद्रराजे

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:04AMलिंब : वार्ताहर 

वेण्णानगर वेळे-कामटी रस्त्यासाठी निधी देण्यासाठी तुम्ही काय मुख्यमंत्री आहात काय? असे म्हणणार्‍या विरोधकांच्या मनात असेल तर आणि जनतेचे प्रेम असेल तर मी मुख्यमंत्री सुद्धा होईन. दुसर्‍यावर टीका करण्यापेक्षा विकास कामे आणा  आणि दुसर्‍यांनी केलेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नका, अशी टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

लिंब, ता. सातारा येथे विविध विकास कामांचे  उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जि. प. चे  माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, अजिंक्यताराचे चेअरमन सर्जेराव सावंत, जि. प. सदस्य प्रतीक कदम, सौ कमल जाधव, पंचायत समितीच्या सदस्या सौ सरिता इंदलकर, राहुल शिंदे, दयानंद उघडे, सौ छाया कुंभार, धनंजय शेडगे, गणपतराव शिंदे, राजेंद्र शेडगे, इंद्रजित ढेंबरे, सरपंच सौ विद्या सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, लिंब हे महाराजांचे गाव. त्यांनी गावात स्वार्थासाठी ग्रामसभा घेण्यापेक्षा तसेच स्वतःच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह मोठे मंत्री आणण्यापेक्षा विकासाची कामे आणावीत. भाजपचे सरकार राष्ट्रवादीच्या सहकारी बँका अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी सातार्‍याबरोबर पुणे, नगरसह इतर जिल्हा बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेवर अटकाव आणला आहे. 

मी तुमच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून उभा असल्याचे सांगून आ. शिवेंद्रराजे म्हणाले, भविष्यातील मी निवडणुकांसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.निवडणुकांनंतर तुम्हाला ते परत पाच वर्षानंतरच दिसतील. माझ्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाऊ नका अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 
उपसभापती जितेंद्र सावंत  म्हणाले, बाबराजेंच्यामुळेच लिंब गटासह तालुक्यात खर्‍या अर्थाने विकास झाला आहे. लिंबच्या विकासासाठी नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण करत राहणार आहे. भागात विकासाचे राजकारण करणार परंतु दमबाजींचे आणि  खोटेपणाचे राजकारण करणार नाही. त्याबरोबर सामाजिक ऐक्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे आणि यापुढेही  करणार आहे. यावेळी सर्जेराव सावंत यांचे भाषण झाले, प्रास्ताविक अ‍ॅड. अनिल सोनमळे यांनी केले तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले.