Thu, Jun 20, 2019 21:21होमपेज › Satara › कराडातील शिवमंदिरे भाविकांचे शक्तिपीठे  

कराडातील शिवमंदिरे भाविकांचे शक्तिपीठे  

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 9:00PMकराड : प्रतिभा राजे

ईश्‍वर म्हणजे शिव. देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्तीभावाने केली जाते. कराडमध्ये संगमेेश्‍वर, हाटकेश्‍वर, कमळेश्‍वर, रूद्रेश्‍वर, कोयनेश्‍वर, सोेमेश्‍वर आदी शिवमंदिरे आहेत. ही मंदिरे म्हणजे कराड व परिसरातील भाविकांची शक्तिपीठे आहेत. महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील सोमवार, तसेच दर सोमवारी याठिकाणी शिवभक्तांची गर्दी असते. कराडमधील सर्व शिवमंदिरातील गाभार्‍यातील महादेवाची पिंड मन प्रसन्न करून स्फूर्ती देणारी आहे. 

संगमेश्‍वर 

प्र्रीतिसंगमाजवळचे हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात चौमुखी ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. संपूर्ण भारतात पुष्करतीर्थ, माहुली व कराड या तीनच ठिकाणी अशी मूर्ती आहे. गाभार्‍यामध्ये महादेवाची पिंड आहे. 

हाटकेश्‍वर

कराडचे हे ग्रामदैवत आहे. गाभार्‍यातील पिंड पाच फुट उंचीची आहे. या मंदिरात प्रवचने, कीर्तने, पुराणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. 

कमळेश्‍वर

कृष्णाकाठी असणारे प्राचीन शिवमंदिर आहे. हे स्वयंभू शिवाचे मंदिर मानले जाते. पिंड गाभार्‍यात असून, नंदी मात्र एकदम बाहेर आहे. देवळाच्या भोवती तट आहेत. . 

रत्नेश्‍वर

1739 साली सरदेशमुखांनी हे मंदिर बांधले आहे. त्याअगोदर त्याठिकाणी एक लहानसे हेमाडपंथी देऊळ आहे. गाभारा व मंडप हे नक्षीदार खांबांनी युक्त आहे. 

त्रिबंकेश्‍वर

1734 साली त्र्यंबकदीक्षित उमराणी यांनी बांधले. गाभार्‍यात फक्त शिवपिंड असून शिखरात अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 

रूद्रेश्‍वर
या पिंडीवर रूद्राक्षासारखी केशरचना असलेला अडीच फूट घेराचा मानवी चेहरा आहे. कृष्णा घाटाकडे हे मंदिर आहे.  

कोयनेश्‍वर
 कोयनाकाठी घोडे खडक म्हणून मोठा खडक आहे. या खडकावरच हे जुने हेमांडपंती शिवमंदिर आहे. या देवळाचे शिखर व कृष्णापूल देवळाचे शिखर समुद्रसपाटीपासून पातळी एक असावी. त्यामुळे कोयनेश्‍वर देवळाचे शिखर बुडाले की कृष्णा पुलावरून पाणी गेले असे समजले जाते.      

सोमेश्‍वर
पुरातन व जागृत देवस्थान आहे. मंदिरात शंकर, पार्वती, गणेश यांच्या मूर्ती आहेत. महादेवाची शाळुंखी साडेतीन ते पाच फुट उंच असून त्यावर तांब्याच्या नागांच्या फणा दोन फुट उंच आहे. समोर नंदी व कासव आहे. महादेवाची शाळुंखी साडेतीन ते पाच फूट उंच असून त्यावर तांब्याच्या नागांच्या फणा दोन फूट उंच आहे. मंदिराचे भव्य शिखर तीस फूट उंचीचे आहे. असून तामिळनाडूमधील रामेश्‍वराचे कलाकार शेरवाई यांनी केले आहे. शिखरावर संतांची व देवादिकांची चित्रे काढण्यात आली  आहेत. शिखरावरील कळस तांब्याचा आहे. 

बटाण्यांचे शिवमंदिर
 गुरूवार पेठेतील मनोर्‍यासमोर ज्ञानोबा कृष्णराव बटाणे यांनी सुमारे दीडशे वर्षापूवीं हे शिवमंदिर स्थापन केले आहे. आत खंडोबाची म्हाळसाकांत मूर्ती, एकवीरादेवी आणि स्वयंभू पिंड आहे. 

महादेव मंदिर
 शुक्रवार पेठेतील महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. शिवशंभूची ही मंदिरे कराडची शक्तीस्थाने आहेत.