Fri, Feb 22, 2019 05:44होमपेज › Satara › वाल्मिकी पठारावरील निसर्गरम्य शिवमंदिर

वाल्मिकी पठारावरील निसर्गरम्य शिवमंदिर

Published On: Aug 27 2018 1:18AM | Last Updated: Aug 26 2018 8:49PMसणबूर : तुषार देशमुख

वाल्मिकी पठारावरील प्राचीन शिव मंदिर जिर्णोध्दाराच्या प्रतिक्षेत असून वाल्मिकी दर्शनाला येणारे भाविक आवर्जून या प्राचीन शिवमंदिराला भेट देतात. निसर्ग रम्य वातावरण, हिरवीगार झाडी, खळखळणारे धबधबे अशा आल्हादायक वातावरणात श्रावण महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक वाल्मिक पठारावरील शिवमंदिराला भेट देत असतात. 

चोकोबा बुवा नावाचे भक्त त्याकाळी वाल्मिकी मंदिरात पाणी घालण्याचे काम करत होते. याच बुवांनी शिवमंदिर बांधण्याचे ठरवलं. वाल्मिक पठारावरील जंगलातून लाकूड फाटा जमवून मंदिराची उभारणी केली. त्यानंतर येथे येणारा भाविक या मंदिराला भेट देवून शिवदर्शनाचा आनंद घेत असतात. परंतू आता या मंदिराची बकाल अवस्था झाली आहे. या मंदिर परीसरात घाणीचे व झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले असून मंदिराची देखील पडझड झाली आहे. या प्राचीन मंदिराची डागडूजी करून हे प्राचीन मंदिर जपणे विभागातील नागरीकांसह श्रद्धाळू भाविकांचीही जबाबदारी असलेने या मंदिराच्या दुरूस्तीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होवून हे प्राचीन मंदिराचे जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे.