Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Satara › निसर्गाच्या कुशीतील खळ्याचे शिवमंदिर

निसर्गाच्या कुशीतील खळ्याचे शिवमंदिर

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 8:57PMतळमावले : नितीन कचरे

खळे (ता. पाटण) येथील गर्द झाडींच्या, निसर्गाच्या कुशीत वसलेले अतिप्राचीन पांडवकालीन शिवमंदिर श्रावणातील प्रत्येक सोमवारी विभागातील शिवभक्तांनी गर्दीने फुलुन निघते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त दर्शनासाठी येतात. तसेच तळमावले, ढेबेवाडी विभागातील अतिप्राचीन एकमेव हेच मंदिर आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी असते. 

काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या सभोवताली खोदकाम केले असता मोठ्या शिळा सापडल्या होत्या. त्याच्यावरील केलेले कोरीव काम हे पुरातत्व विभागासाठी पर्वणीच ठरु शकते. हे मंदिर अतिप्राचीन असल्याचे  शिल्पाकृती वरुनच समजते. हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधले आहे. कारण सकाळ झाल्यानंतर मंदिराच्या सभोवताली काढलेला पाया तसाच ठेवण्यात आला होता जेवढे काम रात्रीमध्ये पूर्ण झाले तेवढे काम पूर्णत्वास गेले आहे. म्हणूनच हे मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये पूर्ण केले असल्याची अख्यायिका सांगितली जाते. मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या शिळा या भल्या मोठ्या आकाराच्या आहेत. त्यावर केलेले कोरीव काम आणि मंदिराची मजबूत उभारणी यावरून असे लक्षात येते की त्यावेळच स्थापत्यशास्त्र किती समृद्ध होते. खळे येथील शिवमंदिरासारखी इतर मंदिरे आत्ताच्या स्थापत्यशास्त्रास एक आव्हानच आहे. या मंदिरास पुरातत्व खात्याने एकदा आवश्य भेट द्यावी आणि हा अतिप्राचीन ठेवा जपून करावा, अशी मागणी होत आहे. 

तसेच अतिप्राचीन मंदिर म्हणून खळे येथील शिवमंदिरास एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला पाहिजे आणि या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.