Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Satara › शिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा

शिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
वडूज : वार्ताहर

येथील डॉ. विवेकानंद माने यांना दीड लाख रुपयांची मागणी करणार्‍या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचचे जिल्हाध्यक्ष विश्‍वास किसनराव चव्हाण (रा. फलटण) याच्यासह शिवसेनेची महिला पदाधिकारी यांच्यावर  वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 11 रोजी  आपण चारुशिला हॉस्पिटलमध्ये ओपीडी काम करीत असताना चार ते पाच अनोळखी पुरुष व एक महिला आली. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्यावतीने लेखी पत्र दिले. त्यात त्यांनी रंजना पाटील (देशमुख) रा. कुरोली, ता, खटाव यांचे तीन वर्षांपूर्वी खुब्याचे ऑपरेशन झाले होते. ते तुम्ही कृत्रिम सांधा टाकून केले होते. ते तुम्ही व्यवस्थित केले नव्हते. त्यामुळे तो कृत्रिम सांधा तुटून त्रास होत आहे, असे त्या पत्रात लिहिले होते. 

यामध्ये ऑपरेशनचा काहीही दोष नसून तुमच्या मते पेशंट तीन वर्षे चालत होता. तरी तो कृत्रिम सांधा तुटला असल्यास आपण ज्या कंपनीचा सांधा वापरला आहे त्या कंपनीला कळवूया, असे आपण त्यांना सांगितले. तसेच तुम्ही ऑपरेशन केलेली सर्व कागदपत्रे घेऊन या, असे विश्‍वास चव्हाण याच्यासह सर्वांना सांगितले होते, असे डॉ. माने यांनी फिर्यादित म्हटले आहे. 

कोणत्याही प्रकारची केस टाकू...

सोमवार, दि.25 रोजी सात ते आठ इसम व विश्‍वास चव्हाण, महिला पदाधिकारी माझ्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यापैकी  दोघे  म्हणाले, तुम्ही ऑपरेशन का करू शकत नाही, ऑपरेशन केलंच पाहिजे नाहीतर तुमची बदनामी करतो आणि ती थांबवायची असेल तर आम्हाला  दीड लाख रुपये द्या. महिला पदाधिकार्‍याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस टाकून अडकवू, अशी धमकी दिली, अशी फिर्याद डॉ. माने यांनी दाखल केली आहे.