Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कराडसह परिसरात शिवजयंती उत्साहात

कराडसह परिसरात शिवजयंती उत्साहात

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 8:37PMकराड : प्रतिनिधी

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी कराडसह परिसर अक्षरश: दणाणून गेला. सोमवारी शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी मावळ्यांनी छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. 

नगरपालिकेने येथील दत्त चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. कराडसह तालुक्यात शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा परिसरात नगरपालिकेकडून आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर रंगबेरंगी फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरीकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आ. बाळासाहेब पाटील,  भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. उतल भोसले,नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील तसेच नगरसेवक, नगरसेविका, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, बहुजन शिक्षक संघटनेचे प्रवीण लादे, संदीप साळुंखे. गंगाधर जाधव, अख्तर आंबेकर, बाळासाहेब यादव, दादा शिंगण, कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कराड तालुका सकल मराठा बांधव. तसेच शहरातील नागरिक, युवक आदींनी छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. तसेच  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रशासकिय अधिकार्‍यांनी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यानी व नागरीकांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी कराड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये व वाड्यावस्त्यांमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी शिवपुतळ्याची व शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करुन व भव्य मिरवणुका काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी विविध गड किल्ल्यावरुन शिवज्योती आणल्या होत्या. यावेळी शिवमावळ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.