Thu, Nov 14, 2019 07:22होमपेज › Satara › कराड : पूरग्रस्तांना घरे बांधून द्या; शर्मिला ठाकरेंची मागणी (video)

कराड : पूरग्रस्तांना घरे बांधून द्या; शर्मिला ठाकरेंची मागणी (video)

Published On: Aug 14 2019 1:24PM | Last Updated: Aug 14 2019 1:28PM

शर्मिला ठाकरे  कराड : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या भयावह पूरपरिस्थितीबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून राज्य शासनावर टीका केली जात आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मात्र राज्य शासनाचे पूरपरिस्थितीबाबत अप्रत्यक्षरित्या समर्थनच केले. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्यासह मनसे पदाधिकार्‍यांसोबत (ता. १३) आज कराडमधील पूरपरिस्थितीची पाहणी केली. 

यांनंतर ठाकरे म्हणाल्या, पूरपरिस्थिती वाईटच राहिली असती. निसर्ग आपल्या सर्वांपेक्षा खूप मोठा आहे. नदीचे पाणी एवढे वेगात येत होते, सरकारने मदत केली असती तरी पाणी थांबू शकले नसते. दरम्यान आलमट्टी धरणाचे पाणी कर्नाटक सोडत नव्हते. कारण तिकडेही पूर आला असून तीन लाख लोकांना विस्थापित करावे लागले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये भीषण अवस्था होती. शेवटी निसर्गाला तुम्ही जेवढे दाबाल, तेवढे तो तुमच्या अंगावर येणार असेही शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. 

 

तसेच महापुरात मंत्र्यांकडून बोटींग करताना काढण्यात आलेल्या सेल्फीवरून विरोधी पक्षाकडून टीका होत असताना शर्मिला ठाकरेंनी या विषयावर बोलणे टाळले. दरम्यान, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांची घरे पडली आहेत. काहींची धोकादायक बनली आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना घरे बांधून देणे आवश्यक असून त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही देत शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.