Fri, Oct 18, 2019 14:26होमपेज › Satara › शरद पवार सातारा मुक्कामी; राजकीय घडामोडींना वेग  (video)

शरद पवार सातारा मुक्कामी; राजकीय घडामोडींना वेग  (video)

Published On: Oct 03 2019 7:54PM | Last Updated: Oct 03 2019 7:54PM
सातारा : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (ता.०३) सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले. यावेळी जिल्‍ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्‍यांचे उत्‍साहात स्‍वागत केले. येथील प्रीती हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले आहेत. 

पवारांनी यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघासह आठही विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी अर्ज भरून आल्यानंतरच्या घडामोडींची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे ,आ प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते