Sun, Jul 21, 2019 14:42
    ब्रेकिंग    होमपेज › Satara ›  जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार : शरद पवार

 तुमच्या घामाची काळजी आहे : शरद पवार

Published On: Apr 22 2018 11:31AM | Last Updated: Apr 22 2018 11:40AMसातारा : प्रतिनिधी

केद्रशासन व राज्यशासनाच्या माध्यमातून जलसंधारणासाठी निधी उपलब्ध करुन देणार आसल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने माण तालुक्यात गावोगावी श्रमदानाचा उपक्रम सुरु आहे.  रविवारी सकाळी शरद पवारांनी नरवणे येथील श्रमदान कार्यक्रमाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की,  राज्यातील प्रत्येक भागाचे काही ना काही वैशिष्ट आहे. कोकणातील काजू, बदाम आणि आंबा,  ठाण्यात उद्योगधंदे,  बारामती-फलटण- कोल्हापूरला साखरेची कारखानदारी आहे. पण माण-खटाव दुष्काळाच्या छायेत आहे.

या गावांची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न माणदेशी जनता श्रमदानातून करीत आहे. तुमच्या घामाची काळजी आहे या साठी केंद्र व राज्य,शासनाच्या माध्यमातून पाणलोटच्या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. वर्गणी गोळा करुन मेहनतीच्या जोरावर गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहभागी झालात ही आनंदाची गोष्ट आहे. राजकारणातील मतभेद आणि संघर्ष बाजूला ठेवून गावाचा विकास करण्यासाठी आपण काम सूरु केले आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे पवार म्हणाले. 

उरमोडीचे पाणी पाहून समाधान

राष्टवादी काँग्रेसच्या जलसंधारणाच्या भूमीकेमुळे दुष्काळी माण खटावला वरदायीनी ठरणाऱ्या उरमोडी पाणी योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  अजित पवार,  रामराजे नाईक निंबाळकर आणि सुनिल तटकरे मंत्री  असताना उरमोडीला गती मिळाली. या योजनेचे पाणी माणमध्ये आले त्यावेळी पूजनाला येणार होतो, पण दुसऱ्या महत्वाच्या कामामुळे ही जबाबदारी स्वर्गीय आर आर पाटील यांच्याकडे सोपवली होती, असा उल्लेखही पवारांनी केला.

या कार्यक्रमास माजी विभागीय आयुक्त प्रभाकरजी देशमुख माजी खासदार रणजीत सिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा आध्यक्ष सुनिल माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, खटावचे सभापती संदिप मांडवे, माणचे सभापती रमेश पाटोळे, माजी जिल्हाउपाध्यक्ष सुभाष नरळे, जेष्ठ नेते वाघोजीराव पोळ जिल्हा परीषद सदस्या डॉ भारती पोळ, सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी कट्टे, डॉ  संदिप पोळ मनोज पोळ तालुकाध्यक्ष विलास सावंत पिंटू जगताप युवराज सुर्यवंशी सुनिल पोळ सुरेंद्र मोरे कवीता म्हेञे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags : Sharad Pawar, Satyamev Jayate,Water Cup, Paani Foundation, Satara, Khatav Taluka of Satara,