Fri, Apr 26, 2019 16:04होमपेज › Satara › सातारकरांना अंधारात ठेवून 'शांतिदूत' हटवला (Video)

सातारकरांना अंधारात ठेवून 'शांतिदूत' हटवला (Video)

Published On: Feb 09 2018 1:22AM | Last Updated: Feb 09 2018 1:24AMसातारा : प्रतिनिधी 

पोलीस मुख्यालयासमोर गेली 18 वर्ष शांततेचे प्रतिक असणारा शांतीदूत पुतळा सातारा पोलिसांनी रात्री १२.३० वाजता हलवला. हा पुतळा साताऱ्याबाहेर घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर नागरिकांनी पुतळ्यासमोर उस्फुर्त आंदोलनाला सुरुवात केली होती

शांतिदूत शहरातून बाहेर नेण्याला नागरिकांचा विरोध पाहून पोलिसांनी शांतीदूत जिल्ह्याबाहेर न जाता साताऱ्यातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तूर्तास हा पुतळा पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागे ठेवण्यात आला असून लवकरच तो सातारा पोलीस कवायत मैदानावर स्थानापन्न करण्यात येणार आहे. दरम्यान सातारा पोलिसांच्या या कृतीबद्दल साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
(व्हिडिओ : सुशांत पाटील)