होमपेज › Satara › पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पुतळा काढताना तणाव (Video)

पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पुतळा काढताना तणाव (Video)

Published On: Feb 08 2018 10:48PM | Last Updated: Feb 08 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलीस मुख्यालयासमोरील ‘शांतिदूत’ हा पक्ष्याचा पुतळा गुरुवारी रात्री जेसिबीने काढायला सुरुवात झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती सातारकरांना समजताच त्यांनी मुख्यालयासमोर धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर नागरिक मुख्यालयासमोर आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री 10 वाजता सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पुतळा हलवू नये यासाठी उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान , हा पुतळा तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी उभा केला होता. शांततेचे प्रतीक असणारा हा पुतळा पोलीस प्रशासनाकडून काढण्यास सुरुवात केल्याने साताऱ्यात तणाव निर्माण झाला आहे.