Wed, Mar 27, 2019 04:10होमपेज › Satara › शंभूराज देसाईच पुढील आमदार : ना. एकनाथ शिंदे

शंभूराज देसाईच पुढील आमदार : ना. एकनाथ शिंदे

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:02PMसणबूर : वार्ताहर

अभ्यूस आमदार म्हणून शंभूराज देसाई यांची ओळख आहे. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यामुळेच काम करणार्‍या नेत्याला झाकू शकत नसल्याचे सांगत पुढील निवडणुकीतही तेच आमदार होतील, असा विश्‍वास ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

बनपूरी (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर रस्त्याच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री विजय शिवतारे, आ. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, रविराज देसाई, यशराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, वनिता कारंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ना. शिंदे म्हणाले, आ. शंभूराज देसाई यांच्याकडून निधी कसा आणावा, हे शिकण्यासारखे आहे.आपल्या मतदार संघात पाणी,आरोग्य, दिवाबत्ती यासह अनेक कामांचा सातत्याने पाठपुरावा करून ती कामे ते मार्गी लावतात. उत्कृष्ट आमदार कसा आसावा? हे त्यांच्या विधानसभेतील मुद्देसुद भाषणावरून लक्षात येते.असा आमदार पाटण तालुक्याला लाभल्याचे सांगत त्यांची जपणूक करा, असे आवाहन ना. शिंदे यांनी यावेळी केले. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य हिमालयाएवढे होते. लोकनेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत आ. देसाई यांची वाटचाल सुरू   आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आ. देसाई यांच्या कार्याची दखल घेतल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

ना. शिवतारे म्हणाले, जिल्ह्यात सर्वाधिक निधी पाटणसाठी त्यांनी आणला आहे. आमदार आसताना एवढा विकास तर मंत्री झाल्यावर ते किती विकास करतील? याची प्रचिती आत्ताच येते, असेही ना. विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

आ. शंभूराज देसाई यांनी वांग - मराठवाडी लाभक्षेत्रातून वगळण्यात आलेल्या चार गावांना महिंद धरणाखाली कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून पाणी द्यावे, अशी मागणी केली.प्रारंभी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेबद्दल ना. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांनी 27 किलोमीटरमध्ये 2 टोल बसवले, पण...

माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी 26 ते 27 किलोमीटरचा रस्ता केला. पण या रस्त्यावर दोन टोल बसवण्यात आले होते. मात्र आपण 320 कोटींचा कराड ते घाटमाथ्यापर्यंतचा रस्ता विना टोल मंजूर करून आणल्याचे सांगत आ. शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकाच केली.