होमपेज › Satara › सातारा : आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

सातारा : आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

Last Updated: May 28 2020 11:30AM

संग्रहित छायाचित्रसातारा : पुढारी वृत्तसेवा

पनवेल येथून प्रवास करून आलेला आणि मलकापूर (ता. कराड) येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (बाचोली ता. पाटण) येथील ४७ वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने (२१ मे रोजी) कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

२३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  

एन.सी.सी.एस. पुणे यांनी १९१ तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी ३९ असे एकूण २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही  शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

२७ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २७ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ४२२ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १२६ रुग्ण बरे झाले आहेत.  तर २८१ रुग्णांवर उपचार सुरु असून १५ जणांचा मृत्यु झालेला आहे.

तर बुधवारी सकाळी कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५१ इतकी झाली असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा कराडला कोरोनाने जोरदार झटका दिला. कराड तालुक्यातील शेणोली गावातील एकाच कुटुंबातील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

यापूर्वी शेणोली येथे तिघांना कोरोनाची बाधा झाली होती. हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. त्यानंतर याच गावातील दुसऱ्या कुटुंबात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या बुधवारी रात्री १५८ पर्यंत पोहोचली. 

सातारा : 6 जणांचा मृत्यू, 24 तासात 80 पॉझिटिव्ह

होम क्‍वारंटाईन शिक्क्यांमुळे कोरोना संसर्ग?