Tue, Apr 23, 2019 05:41होमपेज › Satara › सेल्फीचा मोह तरूणाईच्या जीवावर

सेल्फीचा मोह तरूणाईच्या जीवावर

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:07PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सध्या सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याासाटी तरुण हरतर्‍हेचे फोटोसेशन करतात. या तरुणाईचा सातार्‍यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा व चार भिंतीच्या टेकडीवरील सेल्फी पाँईंट ठरलेले आहेत. मात्र, सोशल मीडियावर आपल्याला जादा लाईक्स मिळावे, यासाठीचे तरुणाईचे प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतत आहेत. सेल्फीच्या नादापायी अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. याबाबात तरुणांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

अजिंक्यतारा किल्यावर एका  दगडावर उभा राहून सेल्फी घेणारा युवक नुकताच जखमी झाला. या ठिकाणी कोणी  सुरक्षारक्षक नसल्यामुळे येथे येणार्‍या तरुणाईला कशाचेच बंधन राहत नाही. खरं तर काही तरुण सोशल मीडियावर  लाईक्स आणि कमेंटस् मिळवण्याच्या नादात अत्यंत धोकादायकरित्या सेल्फी घेतात. मात्र हा त्यांचा सेल्फीचा मोह त्यांच्या जीवावर बेततोय. सोशल मीडियावर  आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईक मिळण्यासाठी तरुणाईची स्पर्धा सुरु असते. पर्यंटनस्थळी हे तरुण अत्यंत धोकादायकरित्या फोटोसेशन करतात. मुळात सेल्फी जीवावर बेतेपर्यंत अट्टाहास का केला जातो, याचा विचार या तरुणाईने करण्याची गरज आहे. 

अजिंक्यतारा, चार भिंतीवर उत्साहाच्या भरात धोकादायक  टेकडीवर  जाऊन सेल्फी घेण्याचा  प्रयत्न तरुण करतात. सेल्फीच्या नादात बरेचजण जायबंदी झालेले आहेत. गडावर कोणीही सुरक्षारक्षक नसल्यामुळे ह्या तरुणाईला कशाचेच भय राहत नाही.या ठिकाणी मद्य प्राशन करुन धांगडधिंगा घालणारेही बरेचजण आहेत.  मात्र त्यांना कशाचेच भय राहिले नाही. अजिंक्यतारा, चार भिंतीवर तरुणाईबरोबर जेष्ठ नागरिकही फेरफेटका मारण्यासाठी येत असतात. म्हणूनच अजिंक्यतारा व चारभिंती या ठिकाणी सुरक्षारक्षक  नेमण्याची मागणी नागरिकातून होत आहे.