Wed, May 27, 2020 01:33होमपेज › Satara › कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २८२ शेतकर्‍यांची निवड

कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २८२ शेतकर्‍यांची निवड

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:11PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अनु. जातीमधील शेतकर्‍यांसाठी शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यातील 282 लाभार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत निवड करण्यात आली असून यासाठी 3 कोटी 36 लाख 97 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले  आहे. नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरूस्तीसाठी 50 हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी 20 हजार रुपये, पंप संचासाठी 25 हजार रुपये, वीज जोडणी आकारसाठी 10 हजार रुपये, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये, सूक्ष्म सिंचन संचमध्ये तुषार संचासाठी  खर्चाच्या 90 टक्के किंवा 25 हजार रुपये व ठिबक संचासाठी खर्चाच्या 90 टक्के किंवा 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीत 282 लाभार्थ्यांची  निवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी सभापती मनोज पवार यांनी दिली.  नविन विहीरीसाठी 63 लाभार्थ्यांसाठी 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरूस्तीसाठी 105 लाभार्थ्यांसाठी 47 लाख 72 हजार 498 रुपये, इनवेल बोअरींग 27 जणांना  5 लाख 26 हजार 666 रुपये, विद्युत पंपसंचासाठी 225 जणांना 46 लाख 58 हजार 850 रुपये, वीज जोडणी आकारसाठी 153 जणांना 7 लाख 99 हजार 14 रुपये, शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 10 जणांना 8 लाख 72 हजार 24 रुपये, ठिबक सिंचन संचासाठी 91 लाभार्थ्यांना 33 लाख 98 हजार  976 रुपये, तुषार सिंचन संचासाठी 148 जणांना 29 लाख 19 हजार 48 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील व कृषि विकास अधिकारी डॉ. चांगदेव बागल यांनी दिली.