Wed, Sep 26, 2018 18:08होमपेज › Satara › स्कूल बस अचानक पेटली 

स्कूल बस अचानक पेटली 

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:54PM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी

फलटण येथील खासगी शाळेच्या स्कूल बसने सायंकाळी सुमारे 5.15 च्या सुमारास अचानक पेेट घेतला. या बसमध्ये शालेय विद्यार्थी होते; पण चालकाने प्रसंगावधान राखून त्यांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तिरकवाडी हायस्कूलच्या मुलांना ने-आण करणार्‍या स्कूल व्हॅनने सोमवारी सायंकाळच्या वेळी कोळकीजवळ अचानक पेट घेतला. अचानक आग लागताच तत्काळ मुलांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत बस पूर्णपणे जळाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस यंत्रणेकडून पंचनामा सुरू होता.