Tue, Nov 20, 2018 01:30होमपेज › Satara › सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

दाक्षिणात्य ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे वयाच्या 97 व्या वर्षी सातारा येेथे राहत्या घरी निधन झाले.  त्यांच्या पश्‍चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. गोरगरिबांना सहाय्य केले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्‍त होत असून वेळे कामथी या त्यांच्या मूळ गावावरही शोककळा पसरली आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. 27) संगम माहुली, सातारा येथे सकाळी 9. 30 वा. आहे.