Mon, Jul 22, 2019 01:16होमपेज › Satara › गटरच्या दुखण्यावर हवा जालीम इलाज

गटरच्या दुखण्यावर हवा जालीम इलाज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने झेडपी चौकात गटर तुंबत असल्यामुळे ओव्हरफ्लो होवून पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ होवू लागला असून या दुखण्यावर आता जालीम इलाज करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर कर्मचार्‍यांनी गटरच्या कामासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र त्यामुळे तरी येथील समस्येचे त्रांगडे कायमचे मिटावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. झेडपी चौक म्हणजे अलिकडच्या काळात झपाट्याने वर्दळलेला अन् विकसीत झालेला चौक आहे. या चौकात सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण आहे.  जवळच सर्किट हाऊस असल्याने मंत्र्यांची, खासदारांची, आमदारांची व अधिका-यांची ये-जा याच चौकातून होत असून शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, बाजारपेठ, सातारा-पंढरपूर राज्यमार्ग यामुळे हा चौक दिवसेंदिवस ‘डेंजरझोन’ होवू लागला आहे.

त्यामुळे या चौकाची योग्यप्रकारे काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यायला हवी होती. ती न घेतल्याने सातारकरांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सातारा नगरपरिषदेने ठोस कृती आराखडा तयार केल्याचे सांगण्यात येेते. वारंवार लिकेज होणारे येथील गटर हे समस्येचे मूळ कारण आहे. या गटरच्या दुरुस्तीसाठी आता प्रयत्नांची  पराकाष्टा सुरु आहे. त्यानुसार नुकतीच उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पक्षप्रतोद निशांत पाटील, स्थायी समिती सदस्य अ‍ॅड. डी. जी. बनकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, नगरपरिषदेचे अभियंता पाटील, साबळे, आरोग्य निरीक्षक कायगुडे, रणदिवे यांच्यासह अधिकार्‍यांनी पाहणी करुन ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

प्रत्यक्ष कामकाजास सुरवात केल्यानंतर गटरर्समध्ये एम.एस.ई.बी.ची 22 के.व्ही.ची विद्युत लाईन असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काम थांबावावे लागले. विद्युत पुरवठा बंद करुनच सदरचे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित करुन  गतीने काम करण्यात आले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि ऐतिहासिक शहरात येणा-या मंत्र्यांचे, खासदारांचे, आमदारांचे, व्हीआयपी अधिका-यांचे स्वागत या चौकातील दुर्गंधीने होऊ नये या भूमिकेतून स्वतःच नगरपरिषदेने लोकभावनेचा व लोकहिताचा विचार करुन गटर दुरुस्ती कामाला प्राधान्य दिले आहे. मात्र आता दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्याचा त्रास उद्भवू नये, अशी अपेक्षा या भागातील नागरिक व वाहनचालक व्यक्त करत आहेत. 
 


  •