Sun, Oct 20, 2019 01:07होमपेज › Satara › वेलकम २०१८

वेलकम २०१८

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:35PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

2017 या मावळत्या वर्षाला ‘बाय बाय...’ करतानाच नव्या वर्षाच्या स्वागताचा दणकेबाज सोहळा थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री चांगलाच रंगला. अवघ्या जिल्हाभरात उत्साही व जल्लोषमय वातावरणाला रविवारी मध्यरात्री उधाण आले. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचत मावळत्या वर्षाला निरोप देत 2018 या नव्या वर्षाचे दणक्यात  स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. 

सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात विविध तरूण मंडळे, सामाजिक संस्था, संघटना यांनी थर्टीफर्स्टच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तरूणाईने तर ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले होते. सातारा शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, ढाबे यासह ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती, त्यामुळे परिसर विद्युत रोषणाईने फुलून गेला होता. थर्टीफर्स्टची रात्र म्हणजे फुल्ल टू धमालच ठरली. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.